अंतरिम गुणवत्ता यादी


महत्वाची सूचना


दिनांक 23/04/2016 व 24/04/2016 रोजी घेण्यात आलेल्या विविध पदांच्या लेखी परीक्षेची सुधारीत अंतिम उत्तरतालिका दिनांक 30/04/2016 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर उत्तरतालिकेनुसार उमेदवारांना प्राप्त झालेले गुण आज दिनांक 04/05/2016 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहेत. तसेच परीक्षेस गैरहजर उमेदवारांची यादी देखील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

लेखी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचा भाग - 2 हा उमेदवाराला परीक्षेअंती देण्यात आलेला असून त्याद्वारे सुधारीत अंतिम उत्तरतालिकेनुसार आपले गुण काढून घेता येतील. भाग - 1 हा ओ.एम. आर (OMR) मशीनद्वारे तपासण्यात आला आहे व संगणकामार्फत काढण्यात आलेले गुण उमेदवारांना तपासून खात्री करण्याच्या हेतूने प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.

उमेदवारांनी संकेतस्थळावर दर्शविण्यात आलेले प्राप्त गुण व गैरहजर यादी काळजीपुर्वक तपासून घ्यावी. सदर गुणांमध्ये कमी/जास्त अथवा हजर/गैरहजर बाबतीत कुणालाही तक्रार नोंदवायची असल्यास उमेदवारांनी आपले म्हणणे  wcdexam2016@gmail.com  या ई-मेल आय.डी. वर दि. 06/05/2016 रोजी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत सादर करावेत. ई-मेल करताना उमेदवाराने स्वतःचे नाव, जन्मदिनांक, बैठक क्रमांक लिहीणे व उत्तरपत्रिकेचा भाग – 2 स्कॅन करुन ई-मेल वर पुराव्यादाखल जोडणे आवश्यक राहील. विहीत मुदतीनंतर अथवा विहीत पुराव्या अभावी प्राप्त होणा-या हरकतींचा विचार करण्यात येणार नाही.

सदर यादीमध्ये दर्शविण्यात आलेले गुण, हजर/गैरहजर या बाबतीत तसेच इतर सर्व फेरतपासणीच्या आधारे ऑनलाईन अर्जात भरलेल्या माहितीच्या व आरक्षणाच्या निकषांनुसार पुढील निवड याद्या लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील व अशा उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करीता बोलविण्यात येईल.

 

.क्र

पदनाम

 

 

1.

समुपदेक्षक (गट ब अराजपत्रित)

गैरहजर उमेदवार

2.

संरक्षण अधिकारी (गट ब अराजपत्रित)

गैरहजर उमेदवार

3.

शिक्षक

गैरहजर उमेदवार

4.

विधी सल्लागार (गट ब अराजपत्रित)

गैरहजर उमेदवार

5.
कृषी सहाय्यक

गैरहजर उमेदवार